हवाई दलप्रमुखांचे "मिग'मधून उड्डाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नवी दिल्ली- हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज "मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.

राजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी नुकतीच स्वीकारली आहेत. ते "कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.

1999मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल संघर्षाच्या काळात लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हवाई दलाचे यापूर्वीचे प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वदेशी बनावटीच्या "तेजस' या विमानातून उड्डाण करूया विमानाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली होती.