हवाई दलाचे विमान अद्याप बेपत्ताच; शोध सुरु

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जुलै 2016

चेन्नई - चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाणारे भारतीय हवाई दलाचे एएन-32 या मालवाहू विमानाचा आजही (शनिवार) शोध सुरुच आहे. या विमानात दोन वैमानिकांसह नौदल आणि लष्कराच्या जवानांसह 29 जण होते.

एएन-32 हे रशियन बनावटीचे विमान आहे. चेन्नईमधील तंबाराम येथून शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता विमानाने उड्डाण केले होते. हे विमान साडेअकरा वाजता पोर्ट ब्लेअरला पोचणे अपेक्षित होते. मात्र बंगालच्या उपसागरावरून जात असताना ते बेपत्ता झाले. उड्डाणानंतर 16 मिनिटांनी विमान 23 हजार फूट उंचीवर असताना त्याच्याशी अखेरचा संपर्क झाला होता. तेव्हापासून विमानाचा शोध घेण्यात येत आहे. 

मलाक्का सामुद्रधुनीजवळ असलेल्या भारताच्या संरक्षण तळावर हे विमान हवाई दलातील जवानांना घेऊन जात होते. भारतीय तटरक्षक दलासह नौदल आणि हवाई दलाने विमानाच्या शोधासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. पाच विमाने आणि तेरा जहाजे बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत. चेन्नईपासून पूर्वेकडे दोनशे नॉटिकल मैल परिसरात विमानाचा शोध घेतला जात आहे. 

गेल्या वर्षी आठ जूनला भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमानतही टेहेळणी करत असताना बेपत्ता झाले होते. या वेळी विमानात तीन जण होते. तब्बल एक महिन्याहून अधिक सखोल तपास केल्यानंतर 15 जुलैला समुद्रात 950 मीटर खोलीवर विमानाचे अवशेष आणि तिघांचे मृतदेह सापडले होते. 

एएन-32 हे वाहतूक विमान 1984 पासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहे. एकदा इंधन भरल्यावर हे विमान सलग चार तास प्रवास करू शकते. या विमानाचे नुकतेच आधुनिकीकरण करण्यात आले होते. यामध्ये सर्व अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि इतर सुविधा बसविण्यात आल्या आहेत. हे विमान विविध तापमानांतही उड्डाण करू शकते. लहान आणि मध्यम पल्ल्याच्या अंतरापर्यंत मालवाहतूक करण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात येतो.