एअर इंडियाच्या अधिकाऱ्याकडून हवाई सुंदरीशी गैरवर्तन 

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

एअर इंडियाच्या एका हवाईसुंदरीने वरिष्ठ अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी पीडित हवाईसुंदरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या एका हवाईसुंदरीने वरिष्ठ अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी पीडित हवाईसुंदरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सुरेश प्रभू यांनी ट्‌विट करत एअर इंडियाच्या सीएमडींना तातडीने लक्ष घालण्याची सूचना केल्याचे म्हटले आहे. 

हवाई सुंदरीने केलेल्या तक्रारीत म्हटले की, गेल्या सहा वर्षांपासून एक वरिष्ठ अधिकारी सातत्याने त्रास देत आहे. तो अधिकारी एअर इंडियाशी निगडित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांबरोबर असभ्य वर्तन करतो. त्याने माझ्याबरोबरच अन्य महिला सहकाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे. संबंधित अधिकाऱ्याचे नाव आपण मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर जाहीर करू, असे पीडित महिलेने म्हटले आहे. यासंदर्भात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये एअर इंडियाकडे तक्रार केली होती आणि सीएमडींनादेखील पत्र लिहिले होते. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे पीडित हवाईसुंदरीने म्हटले आहे.

Web Title: Air India air hostess accuses senior airline official of sexual harassment, probe ordered