रतन टाटांच्या Air India ला 10 लाखांचा दंड, DGCA कडून कारवाई

संबंधित कंपनीकडून करण्यात आलेली ही कृती गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
air india
air india Sakal

नवी दिल्ली : विमानन नियामक नागरी उड्डाण संचलनालयानं (DGCA) एअर इंडियावर (Air India) कारवाई करत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वैध तिकीट (Flight Ticket) असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडियावर हा दंड ठोठावला आहे, असे या संदर्भात जारी केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. (DGCA Action On Ratan Tatas Air India)

air india
एक चॉकलेट, ९-१० तास पायी चालत विमानतळावर पोहोचले, Air India च्या अधिकाऱ्यांचे आभार

वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग (Flight Boarding)नाकारल्याबद्दल आणि त्यानंतर प्रवाशांना अनिवार्य नुकसान भरपाई न दिल्याबद्दल एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड (Fine) ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्यात आली होती आणि वैयक्तिक सुनावणीही घेण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित कंपनीकडून करण्यात आलेली ही कृती गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. तसेच अशा प्रकराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तात्काळ यंत्रणा राबण्याचा सल्ला दिला असून, जर कंपनी असे करण्यात अयशस्वी झाले तर, डीजीसीएकडून पुढील कठोर कारवाई केली जाईल असेदेखील डीजीसीएने म्हटले आहे.

air india
बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमध्ये रतन टाटा; दिग्गज उद्योगपतीच्या साधेपणाचा Video Viral

नियम काय सांगतो

संबंधित विमान कंपनी एका तासाच्या आत बाधित प्रवाशासाठी पर्यायी उड्डाणाची व्यवस्था करण्यास सक्षम असेल, तर कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही. दुसरीकडे, जर विमान कंपनी पुढील 24 तासांत पर्यायी व्यवस्था पुरवू शकली, तर नियमानुसार 10,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. 24 तासांपेक्षा जास्त काळासाठी 20,000 रुपयांपर्यंतची भरपाई देण्याचे नियम असल्याचे यावेळी डीजीसीएकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

वरील अटी यूएस एव्हिएशन रेग्युलेटर एफएए आणि युरोपियन एव्हिएशन रेग्युलेटर ईएएसए यांच्याशी सुसंगत आहेत आणि प्रवाशांच्या हक्कांचा योग्य सन्मान करण्यासाठी जागतिक स्तरावर तत्सम नियमांचे पालन केले जाते असेदेखील डीजीसीएकडून यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com