वायू प्रदूषण धोकादायक; पण प्राणघातक नाही: हर्षवर्धन 

Harsh Vardhan
Harsh Vardhan

पणजी : दिल्लीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे जीव गेले, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. भारतात प्रदुषणामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडत असल्याचा दावा करणाऱ्या आताच्या वैश्विक अभ्यासकांसमोर पर्यावरण मंत्री यांनी प्रदुषणामुळे लोक मृत्युमुखी कसे पडू शकतात? हा प्रश्न उपस्थित केला आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

द लासेंन्ट काउंटडाउन 2017 च्या अहवालानुसार, 2015 मध्ये भारतात वायू प्रदुषणाने 2.5 मिलीयन लोकांचा बळी घेतला होता. हा आकडा जगभरातून सगळ्यात जास्त आहे. 

हर्षवर्धन म्हणाले, "जर कुणाला फुफ्फुसाचा त्रास असेल आणि प्रदुषित वायू सतत श्वसन नलिकेतून शरिरात शिरत असेल तर हे धोकादायक आहे. जेव्हा अशा व्यक्तीचा मृत्यु होतो तेव्हा काही प्रमाणात प्रदुषणाला आपण या मृत्युला कारणीभूत ठरवू शकतो. मात्र, प्रदुषणामुळेच लाखो लोक मृत्युमुखी पडत असल्याचा सरसकट दावा करणे चूकीचे ठरेल." 

वायू प्रदुषणाला बळी पडणाऱ्यांची आकडेवारी काढत बसण्याची काही गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. विविध लोक विविध आकडेवारी देतील. पण कुणीही हे प्रदुषण कसे आपल्या शरिरास हानिकारक आहे याविषयी मत व्यक्त करत नाही. आपण मुळ मुद्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे," असा सल्ला त्यांनी यावेळी मुलाखतीत दिला.

दिल्ली आणि उत्तर भारतातील वाढते धुक्याचे प्रमाण याविषयी बोलताना, वायू प्रदुषण हे प्राणघातक नसल्याचे पर्यावरण मंत्री म्हणाले. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीने सरकारकडून वैद्यकीय सुविधा पुरविण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. एका अहवालानुसार, कार्सिनोजेनिक प्रदूषकांचा स्तर दिल्ली येथील हवेत वाढला आहे. जागतिक स्तरावर वायू प्रदुषणामुळे कुप्रसिध्द असलेल्या बिजींग शहराच्या तुलनेत दहा पटीने अधिक प्रदुषणाचा स्तर दिल्लीत बुधवारी वाढला आहे. 

गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने धूळ, प्रदूषके आणि खराब वायू यांना देखील प्राणघातक कॉकटेल म्हणून संबोधले आहे. या कॉकटेलमुळे एम्ससारख्या रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांची संख्या 20 टक्क्यांनी वाढल्याने 'आपत्कालीन परिस्थिती' निर्माण झाली आहे. 'द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'ने देखील या वाढत्या वायू प्रदूषणाला 'अ बॅड एन्वायरमेंन्टल एमरज्नेसी' ('आपत्कालीन पर्यावरणीय परिस्थिती') म्हणून संबोधले आहे. 

या 'आपत्कालीन परिस्थिती' विषयी मंत्री महोदयांना विचारले असता 'दिल्लीत प्रदुषणाचा स्तर नक्कीच वाढला आहे. मात्र याला प्रदुषणाची 'आपत्कालीन परिस्थिती' म्हणता येणार नाही', असे मत व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com