अजमेर स्फोटप्रकरणातून असीमानंदांची निर्दोष मुक्तता

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

एनआयए न्यायालयाचा निकाल; तिघांना दोषी ठरवले

जयपूर: अजमेर दर्गा स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सहा जणांची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी अन्य तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून, त्यापैकी एक सुनील जोशी यांचे निधन झाले आहे. विशेष न्यायाधीश दिनेश गुप्ता यांनी या प्रकरणाचा निकाल सुनावला. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्याप फरारी आहेत.

अजमेर येथील संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्‍ती दर्गा परिसरात 11 ऑक्‍टोबर 2007 रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणातील एकूण 13 जणांवर आरोप निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी एनआयएच्या विशेष न्यायालयाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवले आहे. आज या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने आणि आरोपींना हजर केले जाणार असल्याने न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या प्रकरणातील आठही आरोपींना कडक बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी 149 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती; परंतु न्यायालयीन कारवाईदरम्यान अनेकांनी आपले जबाब बदलले. मे 2010 मध्ये या प्रकरणाचा तपास राजस्थानच्या एटीएसकडे सोपवला आणि नंतर 2011 पासून एनआयएकडे हस्तांतरित केला. 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रोजा इफ्तारच्या वेळी दर्गा शरीफ परिसरात शक्तिशाली स्फोट झाला आणि त्यात तीन जण ठार, तर 15 जण जखमी झाले होते. स्फोटानंतर पोलिसांना तपासादरम्यान एक बेवारस बॅग आढळून आली होती आणि त्यात टायमर उपकरणही सापडले होते. एनआयएनने 13 आरोपीविरुद्ध खटला दाखल केला होता.

Web Title: ajmer blast: asimanand acquitted

टॅग्स