माजी मुख्यमंत्री असताना सरकारी बंगला का सोडावा अखिलेश यांचा प्रश्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी बंगले सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उत्तर प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीसंबंधी आज (मंगळवार) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला.

लखनऊ - सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी बंगले सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उत्तर प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीसंबंधी आज (मंगळवार) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला.

त्याचबरोबर, आम्ही बंगला सोडण्यासाठी तयार आहोत, मात्र त्यासाठी वेळ पाहिजे. माझ्याकडे लखनऊत राहण्यासाठी कोणतंही घर नाहीये. जर तुम्ही शोधू शकत असाल तर आम्हाला सांगा,  असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. 

अखिलेश यादव यांनी सुरक्षा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचे कारण देत बंगला सोडण्यास नकार दिला आहे. तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी आपलं वय आणि तब्बेतीमुळे बंगला सोडण्यास वेळ मागितला आहे. मायावती यांनी तर बंगल्याला काशीराम यांचं स्मारक करुन टाकलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने मायावती, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि इतर तीन माजी मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ दिवसांत बंगला खाली करण्याचा आदेश दिला होते.

Web Title: Akhilesh Yadav Asked why shold leave from home