अच्छे दिननंतरचे कॅशलेस अर्थव्यवस्था मोठे स्वप्न 

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीवर टीका करीत, "अच्छे दिन'नंतरचे "कॅशलेस अर्थव्यवस्था' हे मोठे स्वप्न असून आगामी विधानसभा निवडणुकीतील एक मुद्दा असेल, असे स्पष्ट केले आहे. 

हुतात्म्यांच्या नातेवाइकांना आणि एटीएम आणि बॅंकेच्या रांगेत उभे राहिल्यानंतर ज्यांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. 

अखिलेश यादव म्हणाले की, कॅशलेस अर्थव्यवस्था हे अच्छे दिनपेक्षा मोठे स्वप्न असून, ते कसे पूर्ण होणार ते सरकार बघेल. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले की, सरकारने नागरिकांना धोका दिला असून, अर्थव्यवस्थेलाही नुकसान पोचविले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक मोठा बदल होईल असे लोकांना वाटत होते किंवा त्यांचा तो भ्रम होता; मात्र आता तेच लोक अर्थव्यवस्थेत फारसा बदल होणार नाही असे म्हणू लागले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञही त्याबाबत लिहू लागले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएम आणि बॅंकांच्या रांगेत ज्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.