ईव्हीएममध्ये गडबड असतानासुद्धा मतदानाला जाऊन आपले कर्तव्य पार पाडा - अखिलेशचे मतदारांना आवाहन 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नुरपुर विधानसभेसाठी सोमवारी (ता.28) मतदान होणार आहे. परंतु, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करुन ईव्हिएममशिनवर प्रश्नचिऩ्ह उपस्थित केले आहे. पोटनिवडणुकीत होणाऱ्या मतदानावेळी ईव्हिएम मशिन मध्ये गडबड आहे. परंतु, त्यामुळे मतदारांनी मतदान करण्याचे टाळू नये, मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडावे, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी शामली, कैराना, गंगोह, नकुड, थानाभवन आणि नूरपुरच्या जवळपास 175 मतदान केंद्रावरील ईव्हिएम मशिन खराब असल्याची तक्रार करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उत्तरप्रदेश - उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेसाठी सोमवारी (ता.28) मतदान होणार आहे. परंतु, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करुन ईव्हिएममशिनवर प्रश्नचिऩ्ह उपस्थित केले आहे. पोटनिवडणुकीत होणाऱ्या मतदानावेळी ईव्हिएम मशिनमध्ये गडबड आहे. परंतु, त्यामुळे मतदारांनी मतदान करण्याचे टाळू नये, मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडावे, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी शामली, कैराना, गंगोह, नकुड, थानाभवन आणि नूरपुरच्या जवळपास 175 मतदान केंद्रावरील ईव्हिएम मशिन खराब असल्याची तक्रार करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाकडेही याची  तक्रार केली आहे. कैराना आणि नुरपुरमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव नक्की होणार, असे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तत्पुर्वी कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज ( सोमवार) सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कैराना लोकसभेसाठी 12 तर नूरपूर विधासभेसाठी 10 उमेदार रिंगणात आहेत.

भाजप खासदार हुकुम सिंह आणि नुरपूरचे आमदार लोकेंद्र चौहान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान होत आहे. याचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.

Web Title: akhilesh yadav on twitter