हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी अक्षय कुमारचा पुढाकार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई- हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने एक नवीन कल्पना मांडली आहे. सर्व भारतीयांना सहजपणे हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करता यावी यासाठी एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्याची इच्छा अक्षय कुमार याने व्यक्त केली आहे.

याबाबत अक्षय कुमारने सोशल मीडियावर एका व्हिडिओमधून जाहीर आवाहन केले आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार आपल्या मनात असल्याचे त्याने म्हटले आहे. 

अक्षय म्हणाला, "पराक्रम गाजवताना हुतात्मा होतात. सरकार त्यांच्या कुटुंबीयांना मदत देते. ते त्यांचे कर्तव्यच आहे. याशिवाय अनेक सामान्य नागरिकांचीही अशी मदत करण्याची इच्छा असते. परंतु, त्यांना त्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा थेट पत्ता, संपर्क लोकांना सहज प्राप्त होत नाही. 
अशा लोकांसाठी मी एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ इच्छितो. एखाद्या जवानाला वीरमरण आले तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांचा पत्ता आणि बँक खाते क्रमांक एका वेबसाईटवर उपलब्ध करून द्यायचे, जेणेकरून इच्छुक लोक त्यांना थेट मदत करू शकतील. यामुळे त्या शूर जवानाच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे न घालता काही प्रमाणात मदत उपलब्ध होऊ शकेल. 

यापूर्वी त्याने बंगळूरमधील छेडछाडीबद्दल तीव्र निषेध व्यक्त करीत महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले होते. त्यावर बहुतांश लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. 'स्वतः चित्रपटात मुलींसोबत नाच-गाणी करणारा आम्हाला नीतीमत्ता शिकविणार का' अशा कानपिचक्याही काहींनी त्याला दिल्या होत्या. या प्रतिसादाबद्दल अक्षयने आभार मानले. 

आपली कल्पना पटवून देताना अक्षय म्हणतो की, "देशभरातील हजारो लोकांनी केवळ शंभर रुपये मदत केली तरी लाखो रुपये जमा होतील. त्यामुळे त्या हुतात्मा जवानाच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित होईल." 
या कल्पनेबाबत लोकांची मते अक्षयने मागविली आहेत.
 
सकाळ व्हिडिओ

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017