गुजरातमधील मद्य माफियाकडून अडीच कोटीचे मद्य जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

मद्य माफिया रमेश जगुभाई पटेल यांच्या दमण येथील बेकायदेशीर गोदामावर अंमलबजावणी संचालनालयाने आज (बुधवार) छापे टाकले. या छाप्यात पटेल यांच्याकडून अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले.

नवी दिल्ली - मद्य माफिया रमेश जगुभाई पटेल यांच्या दमण येथील बेकायदेशीर गोदामावर अंमलबजावणी संचालनालयाने आज (बुधवार) छापे टाकले. या छाप्यात पटेल यांच्याकडून अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले.

छाप्यादरम्यान पटेलचे दमण येथे बेकायदेशीररित्या परदेशी मद्य विक्रीचे दुकान असल्याचे आढळून आले आहे. दमण येथे मोठ्या प्रमाणात परदेशी मद्याची तस्करी करण्यात येत होती आणि स्थानिकांच्या मदतीने मद्याचे गुजरातमध्ये विक्री करण्यात येत होती. गेल्या तीन वर्षांपासून पटेलच्या खात्यात 223.47 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये गुजरातमधील पोलिस स्थानकांत पटेलविरूद्ध 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सूरत येथील पोलिस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अंमलबजावणी संचालनालय पुढील चौकशी करत आहे.

गुजरातमध्ये 1960 पासून मद्यबंदी लागू आहे. त्यानंतर नागालॅंड आणि बिहारसह अन्य काही राज्यांनीही मद्यबंदी लागू केली आहे.

Web Title: Alcohol Worth 2.5 Crores Seized In Daman In Crackdown On Gujarat's Liquor Don