बाबरी मशीद: अडवानींसह 12 जणांना जामीन मंजूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात भाजप नेत्यांविरुद्ध पूर्वनियोजित कट रचल्याचा ठपका ठेवला होता. त्यानुसार न्यायालयाने अडवानी, उमा भारती आणि जोशी यांच्याविरुद्ध कटकारस्थानसंबंधीचा खटला चालविण्याचे निर्देश दिले होते. त्यांचा खटला रायबरेली न्यायालयातून लखनौच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला होता.

लखनौ - अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर केला.

बाबरी मशीद पाडण्यात आल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात दररोज सुनावणीला सुरवात केली. 6 डिसेंबर 1992 रोजी कटकारस्थान करून मशीद पाडल्याच्या भाजप नेत्यांवरील आरोपाची न्यायालय तपासणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने अडवानी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार साध्वी ऋतंभरा आणि विष्णू हरी डालमिया यांच्यासह 12 जणांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी सर्वजण सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. या सर्वांना न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपांवरील सुनावणी अद्याप बाकी आहे.

न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार, अडवानी, उमा आणि जोशी यांना त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात भाजप नेत्यांविरुद्ध पूर्वनियोजित कट रचल्याचा ठपका ठेवला होता. त्यानुसार न्यायालयाने अडवानी, उमा भारती आणि जोशी यांच्याविरुद्ध कटकारस्थानसंबंधीचा खटला चालविण्याचे निर्देश दिले होते. त्यांचा खटला रायबरेली न्यायालयातून लखनौच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आला होता. तसेच नृत्यगोपाल दास, महंत रामविलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपत राय बंसल, धर्मदास आणि डॉ. सतीश प्रधान यांच्याविरोधात आरोप निश्‍चित करण्यासाठी सुनावणी ठेवली होती; पण त्यापूर्वीच ते न्यायालयासमोर हजर झाले आणि त्यांना न्यायालयाने जामीन दिला. आता या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मॉन्सून आला रे! केरळच्या किनारपट्टीवर दाखल​
बारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी​
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​