सर्व राजकीय पक्ष कुटुंबकेंद्रित : चिदंबरम

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांनी काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. सर्व राजकीय पक्ष कुटुंबकेंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

चेन्नई (तमिळनाडू) - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांनी काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. सर्व राजकीय पक्ष कुटुंब केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

'जनरेशन 67' (जी-67) फोरमच्या कार्यक्रमात कार्ती बोलत होते. ते म्हणाले, 'काँग्रेससह भारतातील बहुतेक राजकीय पक्षांवर कुटुंबांचा प्रभाव आहे आणि त्यामुळेच हे पक्ष खाजगी कौटुंबिक मालमत्ता बनले आहेत. ज्यांना राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहेल, त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची स्तुती करावी लागते. ज्या कुटुंबाने पक्ष स्थापन केला आहे, त्याच कुटुंबातील सदस्यांसाठी पक्षाचे नेतृत्त्व राखीव असते.'

कार्ती यांनी 2014 साली काँग्रेसच्या वतीने तमिळनाडूतील सिवागंगा येथून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते.

कोण आहेत कार्ती चिदंबरम?
पी. चिदंबरम यांचे सुपत्र कार्ती हे व्यावसायिक असून त्यांच्या भारतात आणि भारताबाहेर अनेक कंपन्या आहेत. कार्ती यांच्या कंपन्यांबाबत 2015 मध्ये माहिती समोर आली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली.