समविचारी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे- पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर बोलताना शरद पवार म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाला (भाजप) विधानसभा निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद पाहता सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन सामना करायला हवा. सर्वच पक्षांनी त्यांना मिळालेल्या प्रतिसादाचे परीक्षण करायला हवे. भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.''

याबाबत काही चर्चा सुरू आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""ही सध्या फक्त एक सूचना आहे. यावर अद्याप काही चर्चा सुरू झालेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसला अशा आघाडीचे आमंत्रण आल्यास त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल.''

आदित्यनाथांमुळे धार्मिक राजकारणाला बळ
"उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्याने उत्तरकेडील राज्यात धार्मिक राजकारणाला महत्त्व मिळणार आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याला विकासाचे उद्दिष्ट असावे. विकासापेक्षा मंदिर-मशीद राजकारणाला महत्त्व मिळणार असल्याने मला आता उत्तर प्रदेशमधील जनतेची चिंता वाटते,'' असे पवार यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com