लखनौमध्ये दहशतवाद्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

लखनौ- येथील एका घरामध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने घराला घेराव घातला असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी आज (मंगळवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याजवळ आज सकाळी भोपाळ-उज्जैन एक्‍स्प्रेसमध्ये आठ जण जखमी झाले आहे. या स्फोटप्रकरणी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्याचा हात असण्याची शक्यता आहे. शहरातील ठाकूरगंज येथील एका घरामध्ये संबंधित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईवर गृहमंत्री राजनाथसिंग हे लक्ष ठेवून आहेत.

दहशवादी लपून बसलेला भाग हा नागरीवस्तीचा आहे. संबंधीत घराला 20 कमांडोंनी वेढा घातला आहे. दहशतवाद्याला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी दलजित चौधरी यांनी दिली.

Web Title: Alleged Terrorist On Lucknow Outskirts Refuses To Surrender