अमेरिका निवडणूक: डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

न्यूयॉर्क - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काही वेळातच लागणार असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालातून डोनाल्ड हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

न्यूयॉर्क - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काही वेळातच लागणार असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालातून डोनाल्ड हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

यंदाची निवडणूक ही अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वाधिक चुरशीची ठरल्याची चर्चा करण्यात येत आहे. अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन (वय 69) आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्ब (वय 70) यांच्यात अध्यक्षपदासाठी खरी चुरस सुरू आहे. दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्याने अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष निवडण्यासाठीच्या या प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.