ढोल-ताशांच्या गजरात अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा

America's Independence Day celebrated in the Dhol-tasha group
America's Independence Day celebrated in the Dhol-tasha group

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी. येथे 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या  दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठे संचलन असते. त्यामध्ये संपुर्ण अमेरिकेतून 5 हजार वेगवेगळी कला पथके सामील होण्यासाठी धडपडत असतात. परंतु काही निवडक पथकांनाच यात सामील होण्याचा मान मिळतो. या वर्षीचे वैशिष्ट असे कि यंदा अस्सल भारतीय मुशीच्या देव गर्जना ढोल ताशा पथकाला या संचालनात आमंत्रणाचा दुसऱ्यांदा मान मिळाला. समीर मंगरूळकर, अभिजित पानसे व देव समीर मंगरूळकर यांनी 6 वर्षांपूर्वी हे ढोल ताशा पथक सुरु केले आहे. 

 
गेल्यावर्षी देव गर्जना ढोल ताशा पथकाचे संचलनातील स्थान 119 होते. यावर्षी ते 49 स्थानावर आले. हे कदाचित आपल्या ढोल ताश्याचे यश असावे. या परेडची कल्पना साधारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील राजपथावरील होणाऱ्या संचलनाशी जुळती आहे. देव गर्जना हे पहिले व एकमेव भारतीय ढोल पथक आहे, ज्याला हा बहुमान मिळाला. 

हे पथक बरेच मोठे आणि प्रसिद्ध झाले आहे. मंगरुळकर आणि पानसेंचा पथक सुरु करण्या मागचा उद्देश आपली लोक संस्कृती व परंपरांचे जतन व्हावे आणि हा वारसा अमेरिकेत जन्मलेल्या भारतीयांच्या पुढच्या पिढीला द्यावा असा आहे. 

मुख्य वादक लहान मुले आहेत 
वॉशिंग्टन डी सी मध्ये 4 जुलै ला भयंकर उष्मा होता. तापमान 44 डिग्री होते. कॉन्स्टिट्यूशन ऍव्हेन्यू वर जिथे हे संचलन असते तिथे विना सावलीचे न थांबता वेगाने चालत ढोल-ताशा, लेझीम, झांज, झेंडे नाचवणे हे अतिशय जोखमीचे काम होते. पण कोणीही न थकता हे काम फत्ते केले. वाटेत हजारोंच्या संख्येने दुतर्फा अमेरिकन नागरिक ढोल-ताशांच्या ठेक्यावर थिरकत होते. यातून संगीताला सीमेचे बंधन नसेत ही बाब अधोरेखीत होते. अमेरीकेच्या राजपथावर मराठी ढोल ताशा गरजला हीच अभिमानाची गोष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com