राहुल गांधींकडे मतदारसंघासाठी वेळ नाही : इराणी 

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधी यांना भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी जोरदार टक्कर दिली होती. दरम्यान, अमेठी जिल्ह्यात लवकरच चार आयटीआय संस्था सुरू होतील, अशी माहिती कौशल्य विकास राज्यमंत्री सुरेश पासी यांनी दिली.

अमेठी - भारतासारख्या लोकशाही देशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना "युवराज' पदवीने गौरव करणे ही बाब लोकशाहीचा अपमान करणारी आहे, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे व्यक्त केले.

इराणी यांनी अमेठी दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहुल यांना युवराज म्हणून पाहिले जाते. अमेठीत दीर्घकाळापासून एका राजकीय कुटुंबाचा पगडा आहे. या कुटुंबाने अमेठीच्या लोकांच्या विकासाबाबत कधीही विचार केला नाही. एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या खासदाराकडे मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि मतदारसंघासाठी वेळ नाही, अशी टीकाही इराणी यांनी केली.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधी यांना भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी जोरदार टक्कर दिली होती. दरम्यान, अमेठी जिल्ह्यात लवकरच चार आयटीआय संस्था सुरू होतील, अशी माहिती कौशल्य विकास राज्यमंत्री सुरेश पासी यांनी दिली. सरकारने या आयटीआय स्थापनेला मंजुरी दिली असून, जूनपर्यंत आयटीआय भवनाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Amethi: Smriti Irani slams Rahul Gandhi File Picture (PTI)