शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

ती आणि शेतकरी यांनाच आमचे पहिले प्राधान्य आहे. माझा प्रत्येक श्वास राज्यातील जनतेसाठी आहे. शेतकऱ्यांशिवाय राज्याची प्रगती होऊच शकत नाही.

भोपाळ - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये शांतता निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यालयात न बसता भोपाळमधील दशहरा मैदानावर आज (शनिवार) उपोषणाला सुरवात केली.

शेतकऱ्यांशी खुली चर्चा करणार असल्याचेही चौहान यांनी सांगितले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यास प्राधान्य असून, शेतकऱ्यांच्या आडून अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास दशहरा मैदानात त्यांनी उपोषणाला सुरवात केली. दरम्यान, मध्य प्रदेशच्या कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवराजसिंह यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे, की शेती आणि शेतकरी यांनाच आमचे पहिले प्राधान्य आहे. माझा प्रत्येक श्वास राज्यातील जनतेसाठी आहे. शेतकऱ्यांशिवाय राज्याची प्रगती होऊच शकत नाही. शेतापर्यंत पाणी पोचविणे यासाठी आम्ही आग्रही आहोत. शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या इच्छेशिवाय त्यांची जमीन घेतली जाणार नाही. मूग डाळ 5225 रुपये क्विंटल दराने खरेदी करणार. तर, 23 जूनपासून तूर डाळ 4 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय