भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत शहा यांचा सत्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांना 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार नाही, त्याचप्रमाणे त्यांना तिकीटही देण्यात येणार नाही, असा सौम्य इशारा त्यांनी दिला

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा प्रथमच उपस्थित राहिले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांचा सत्कार केला. या बैठकीत संसदेत अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधानांनी फटकारले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमित शहा आता येथे आहेत. भाजपच्या खासदारांना शिस्त लावण्याचा ते आता प्रयत्न करतील. वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून सभागृहात उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा खासदारांना फटकारले आहे. वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांना 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार नाही, त्याचप्रमाणे त्यांना तिकीटही देण्यात येणार नाही, असा सौम्य इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी राज्यसभेत अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर भाजपने कारवाई केली होती. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक पाठिंबा देण्याची मागणी केली होती. विरोधकांना या सभागृहात मोठा गोंधळ घातला होता. लोकसभेने या घटनात्मक दुरुस्तीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता तीन महिने वेळ लागेल.