योगासनांमुळे अमित शहांचे वजन 20 किलोने कमी:रामदेव बाबा

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

योग हा एक खेळ नसल्याचा दावा करणारे लोक हे अज्ञानी असून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करावयास हवे. योग हासुद्धा एक खेळच आहे. योग हा ऑलिंपिकमधील एक प्रकार असावयास हवा

नवी दिल्ली - योगासने केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे वजन 20 किलोंनी कमी झाल्याचे योगगुरु रामदेव बाबा यांनी आज (मंगळवार) सांगितले. रामदेव बाबा हे अहमदाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना शहा यांचा उल्लेख केला.

""योग हा एक खेळ नसल्याचा दावा करणारे लोक हे अज्ञानी असून त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करावयास हवे. योग हासुद्धा एक खेळच आहे. योग हा ऑलिंपिकमधील एक प्रकार असावयास हवा,'' असेही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.

रामदेव बाबा यांनी ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या एनडीएच्या निर्णयाचेही यावेळी स्वागत केले.