अमित शहा 'मातोश्री'वर जाणार नाहीत ?

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

'संपर्क अभियानां'तर्गत अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान मातोश्रीवर जाण्याचे टाळत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी अमित शहा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामाना'तून आज भाजपवर टीका करण्यात आल्याने अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. अमित शहा यांच्या मातोश्रीच्या भेटीबाबत उल्लेखही करण्यात आलेला नाही.

'संपर्क अभियानां'तर्गत अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान मातोश्रीवर जाण्याचे टाळत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष भाजपवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे दिसतही होती. तसेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून रणनिती आखली जात आहे.

तसेच शिवसेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता नाराज झालेल्या शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत असताना मात्र, आज सामानातून भाजपवर टीका करण्यात आल्याने अमित शहा आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: Amit Shah might not go to Matoshree to meet Uddhav Thackeray