स्मृती इराणी, अमित शहांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

राज्यसभेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने कॉंग्रेसच्या काही आमदारांना भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करण्या पुरेसा वेळ मिळणार आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा प्रस्ताव भाजपकडून कॉंग्रेस बंडखोरांपुढे ठेवला जात आहे

अहमदाबाद  - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुजरातमधून आज (शुक्रवार) सकाळी अर्ज भरले. गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात निवड झाल्यानंतर शहा प्रथमच संसदेत प्रवेश करतील. सध्या शहा अहमदाबादमधील नरनपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

भाजच्या संसदीय समितीने बुधवारी शहा व इराणी हे राज्यसभेसाठी गुजरातमधून निवडणूक लढतील यांची असे जाहीर केले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना शह देण्यासाठी भाजपने त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बंडखोर नेते आमदार बलवंतसिंह रजपूत यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरविले आहे. रजपूत यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीही आज उमेजवारी अर्ज दाखल केला. अहमद पटेल यांनी यापूर्वीच अर्ज भरलेला आहे.

"आगामी काळात कॉंग्रेसचे अजून काही आमदार भाजपकडे येणार असले तरी राज्यसभेसाठी अतिशय काळजीपूर्वक मतदान करावे,'' असे आवाहन शहा यांनी भाजप आमदारांना केले. राज्यसभेच्या निवडणुकीला अजून अवधी असल्याने कॉंग्रेसच्या काही आमदारांना भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करण्या पुरेसा वेळ मिळणार आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचा प्रस्ताव भाजपकडून कॉंग्रेस बंडखोरांपुढे ठेवला जात आहे.

गुजरात विधानसभेची एकूण सदस्य संख्या 182 आहे. यात कॉंग्रेसचे संख्याबळ 57 आहे. त्यापैकी 17-18 आमदार कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

केंद्रातील भाजपचे संख्याबळ राज्यसभेत कमी आहे. वरिष्ठ सभागृहातील विरोधकांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पक्षाचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याचे आव्हान भाजपुढे असून अध्यक्ष अमित शहा यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

देश

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM