सोशल मिडियावर फक्त 'अम्मा'च!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - तमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री व ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या सर्वेसर्वा जयलिता यांचे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सोशल मिडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत असून ट्‌विटरवरील "टॉप टेन' ट्रेंडस्‌पैकी दहा ट्रेंडमध्ये अम्मा आणि तमिळनाडूसंदर्भातील विषय असल्याचे आढळून आले आहे. तर फेसबुकवरही टॉप ट्रेंड #RIPAmma असा ट्रेंड आढळून येत आहे.

जयललिता यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे अपोलो रुग्णालयाबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तेथे पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. अखेर सोमवारी रात्री साडे अकरा वाजता त्यांच्या निधनाने वृत्त आले आणि तमिळनाडूसह संपूर्ण देशभर शोककळा पसरली. सोशल मिडियावरही अम्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ट्‌विटरवर दहापैकी #RIPAmma, #IronladymyCM, #Chief Minister, O Paneerselvam, #jaylalitha, #TamilNadu, Apollo Hospital, Apollo, AIADMK असे नऊ विषयांचे ट्रेंड अम्मा आणि तमिळनाडूसंदर्भातील आढळून येत आहेत.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

रविवार, 20 ऑगस्ट 2017