स्कॉर्पिओ रिक्षाने आनंद महिंद्रा प्रभावित

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

स्कॉर्पिओ रिक्षाने आनंद महिंद्रा इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याबदल्यात या रिक्षाच्या बदल्यात सुनिलला नवीन महिंद्रा सुप्रिमो मिनी ट्रकही भेट म्हणून दिला.

कोची - केरळमधील एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाला महिंद्रा स्कॉर्पिओ सारखे मॉडिफिकेशन केले. या गाडीचा फोटो ट्विटरवर एकाने महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना ट्विट करत महिंद्रा स्कॉर्पिओच्या लोकप्रियतेची दाद दिली. 

आनंद महिंद्रा यांनी देखील त्या माणसाच्या कल्पकतेचे कौतुक करत ती गाडी महिंद्राच्या संग्रहालयात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. आनंद महिंद्रा यांच्या सुचने नंतर दिड महिन्यात महिंद्राच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तील शोधून काढले.  
 

या रिक्षाचालकाचे नाव सुनिल असून तो मूळचा केरळचा आहे. त्याच्या स्कॉर्पिओ रिक्षाने आनंद महिंद्रा इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याबदल्यात या रिक्षाच्या बदल्यात सुनिलला नवीन महिंद्रा सुप्रिमो मिनी ट्रकही भेट म्हणून दिला.