तक्रार करणाऱ्या विधवा महिलेला सरपंचाकडून अमानूष मारहाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

अनंतपूर (आंध्र प्रदेश) - घरासमोरून जाणाऱ्या पाण्याच्या टाकीमुळे घराकडे जाणारा रस्ता बंद होत असल्याची तक्रार करण्यास गेलेल्या विधवा महिलेला गावातील सरपंचाने अमानूष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुधा नावाच्या 48 वर्षांच्या विधवा महिलेच्या दारात गावातील पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. मात्र या टाकीमुळे घरात जाण्यासाठी रस्ता बंद होत असल्याची तक्रार घेऊन ती गावातील सरपंचांकडे आली. यावेळी गावातील एका समितीतील चंद्रा नावाचा सदस्य सरपंचांकडे आला होता. मात्र, नागाराजू नावाच्या सरपंचाने महिलेची तक्रार ऐकून घेण्याऐवजी गावातील समितीतील सदस्यासह अमानूष मारहाण केली. लाथा मारून केसाला ओढत तिला फरफटत नेण्यात आले.

अनंतपूर जिल्ह्यातील कुदेरू मंडळातील जल्लीपल्ली गावात रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने गुरूवारी ही धक्कादायक घटना समोर आली. ज्या तरुणाने हा व्हिडिओ अपलोड केला होता त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी कुदेरू पोलिसांनी नागाराजू यांच्यासह चंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.