मोटारीच्या अपघातात मंत्र्याच्या मुलाचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

एका भीषण अपघातात आंध्र प्रदेशमधील मंत्री पी. नारायण यांचा मुलगा निशिथ आणि त्याच्या एका मित्राचा आज (बुधवार) पहाटे मृत्यू झाला आहे.

हैदराबाद - एका भीषण अपघातात आंध्र प्रदेशमधील मंत्री पी. नारायण यांचा मुलगा निशिथ आणि त्याच्या एका मित्राचा आज (बुधवार) पहाटे मृत्यू झाला आहे.

हैदराबादजवळील जुबिली हिल्समधील जुबिली हिल्स चेक पोस्टजवळ मेट्रोच्या खांबाला धडकून निशिथच्या मोटारीला अपघात झाला. आज पहाटे साधारण तीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात निशिथ आणि त्याच्या एका मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद जुबिली हिल्स पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर अन्य एकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. पहाटे जोराचा आवाज झाल्याने धावत जाऊन पाहिले तर एसयुव्ही मोटार मेट्रोच्या खांबाला अपघातग्रस्त अवस्थेत आढळली. मोटार कदाचित खूप वेगात असल्याचे अपघात झाला असावा, अशी शक्‍यता घटनास्थळाजवळ असलेल्या एका सुरक्षारक्षकाने पोलिसांनी बोलताना दिली.

पी. नारायण हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या घटनेबाबत समजल्यानंतर ते परत येत आहेत.

Web Title: Andhra's Mister's son killed in road accident