'स्पीड पोस्ट'ने दिला तलाक; पीडितेचे मोदींना पत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

तोंडी तलाक पद्धती बंद करण्याबाबत देशभर चर्चा करण्यात येत असताना दररोज तोंडी तलाकचे प्रकरणे समोर येत आहेत. अमरोहा येथील एका महिलेला तिच्या पतीने 'स्पीड पोस्ट'ने तलाक दिला असून पीडित महिलेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे.

अमरोहा (उत्तर प्रदेश) : तोंडी तलाक पद्धती बंद करण्याबाबत देशभर चर्चा करण्यात येत असताना दररोज तोंडी तलाकचे प्रकरणे समोर येत आहेत. अमरोहा येथील एका महिलेला तिच्या पतीने 'स्पीड पोस्ट'ने तलाक दिला असून पीडित महिलेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे.

पीडित महिला 2014 साली अरिफ अली नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबद्ध झाली होती. सुरुवातीचे काही दिवस सारे काही सुरळित सुरू होते. मात्र, त्यानंतर नवऱ्यासह सासरकडील मंडळी हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले. तिला घराबाहेरही काढण्यात आले. त्याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान तिच्या पतीने दुसरा विवाह केला आणि पीडित महिलेला तलाक दिला. या प्रकरणी पीडितेने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. अलिकडच्या काळात तोंडी तलाकची अनेक प्रकरणे बाहेर येत असून त्यातील पीडित महिला न्यायासाठी मोठ्या आशेने मोदी आणि आदित्यनाथ यांना पत्र लिहित आहेत.

्रअलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तोंडी तलाकबाबत भूमिका घेणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करत तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषी असल्याची टीका केली आहे.