सावर्डे दुर्घटना : दुसरा मृतदेह सापडला मध्यरात्री; शोध सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

हॉस्पिसिओ हॉस्पिटलला शिफ्ट केलेले  लोक
राजाराम गायक, (45 वर्षे, पंचवाडी)
महादेव उपेंद्र, (43 वर्षे, बॅग शिरफोड)
मार्तुजा किलगिरी, (40 वर्षे, बागवाडा)
लतीफ शेख, (55 वर्षे, टोनी नगर)
रमेश कुमार, (23 वर्षे,  मापा)

पणजी : गोव्यातील सावर्डे पदपूल दुर्घटनेमधील दुसरा मृतदेह मध्यरात्री अडीच वाजता सापडला. एका 25 वर्षांच्या युवकाचा हा मृतदेह आहे. रात्री पावणेतीन वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. सकाळी 7 वाजता नौदलाच्या पाणबुड्यांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह अद्याप लागलेला नव्हता. नदीत मगरींच्या वावरामुळे शोधमोहिमेत अडथळे येत आहेत.

शोधकार्य पूर्ण वेगाने सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे या अपघाताबाबत चौकशी केली. बचाव आणि बचाव उपकरणांसह तैनात असलेल्या 35 लाईफगार्डची एक टीम शोध कार्यात मदत करत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रामकृष्ण ढवळीकर, खासदार नरेंद्र साईकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हाधिकारी  स्वप्नील नाईक घटनास्थळी  आहेत. 

मृत व्यक्ती  - बसवराज मलनावर , (30 वर्षे, बाजारवाडा, सांगे)

वाचवलेल्या व्यक्तीची नावे 

हळदणकर बहादूर, (29 वर्षे, गांधीनगर)
मुशकी मोहन, (40 वर्षे, टोनी नगर, सावर्डे)
नवदीप गायक, (22 वर्षे, पंचवाडी)
गणपत बिमानी, (36 वर्ष, कापशे)
शेखर नाईक, (48 वर्षे, दाढें)
मुरुजू शेख, (18 वर्षे, कुडचडे)
साजित शेख, (24 वर्षे, टोनी नगर, सावर्डे)
मनोज रायकर, (40 वर्षे, मळकर्णे)
विठ्ठल दाणी, (35 वर्ष, सावर्डे)

सावर्डे येथील पोर्तुगीजकालीन पदपुलावरुन उड़ी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताना बघ्यांसह पदपूल कोसळून काल सायंकाळी अपघात झाला. पदपुलावरील 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त केली जात होती.

Web Title: another dead body recovered in savarde mishap