पूँचमध्ये चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

जम्मू - जम्मू काश्मीरमधील पूँच जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये आज (सोमवार) सकाळी पुन्हा सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. रविवारपासून सुरु असलेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नौगाम भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणारे चार दहशतवादी लष्करी कारवाईत रविवारी ठार झाले होते. आज त्याच ठिकाणी पुन्हा चकमक सुरु झाली आहे. याठिकाणी सचिवालयाचे बांधकाम सुरु असून, काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. दरम्यान सुरक्षा रक्षकांना एका घरात बंधक बनवून ठेवलेल्या दांपत्याची सुटका करण्यात यश आले आहे.

नौगाम भागात नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्या रोखण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी लष्करी चौकीवर हल्ला केला. याला लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार मारले होते. तसेच शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.

Web Title: Another militant killed in encounter punch

टॅग्स