अमेरिकेच्या हल्ल्यात 'इसिस'मध्ये गेलेल्या केरळच्या तरुणाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नवी दिल्ली - अमेरिकेने अफगाणिस्तामधील नांगरहार प्रांतातील "इसिस'च्या आश्रयस्थानावर केलेल्या अण्वस्त्ररहित बॉंब हल्ल्यात केरळमधून "इसिस'मध्ये गेलेल्या तरुणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अलिकडेच केरळमधून काही तरुण बेपत्ता झाले होते. हे तरुण इसिसमध्ये गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यापैकी मुर्शिद (वय 24) याचा अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तो केरळच्या कासारगडमधील पादन्ना येथील होता. नांगरहारमध्ये पत्नी आणि मुलांसह राहणाऱ्या आशफाक माजीद कल्लूकेत्तिया पुराईल नावाच्या व्यक्तीने मुर्शिद ठार झाल्याचे सांगितले आहे. आशफाकने सामाजिक कार्यकर्ते बी सी रेहमान यांना "टेलिग्राम'द्वारे याबाबत कळविले. 'आपला आणखी एक भाऊ मुर्शिद ठार झाला आहे. आम्ही त्याला हुतात्मा समजतो', असा निरोप रेहमान यांना आला. रेहमान यांनी याबाबत सविस्तर माहिती विचारली. मात्र त्यावर काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.