हैदराबादेतील आणखी एका महिलेची सौदीत विक्री

Another woman from Hyderabad sold in Saudi Arabia
Another woman from Hyderabad sold in Saudi Arabia

हैदराबाद - हैदराबादमधील आणखी एका महिलेस दलालांनी नोकरीचे आमिष दाखवत तिची सौदी अरेबियात तीन लाख रुपयांना विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथे तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू असून, याची कल्पना तिने स्वतः आपल्या मुलीला दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. 

सलमा बेगम (वय 39) असे या महिलेचे नाव असून, ती बाबानगरमधील रहिवाशी आहे. याच परिसरात राहणाऱ्या अक्रम व शफी या दोघांनी नोकरीचे आमिष दाखवत तिला 21 जानेवारी 2017 रोजी हाउसमेड (मोलकरीण) व्हिसाद्वारे सौदीला पाठविले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सलमा यांच्या लक्षात आले. नंतर त्यांनी आपली मुलगी समिना हिला मेसेजद्वारे याची कल्पना दिली. 

हा प्रकार समजताच समिनाने अक्रमची भेट घेऊन आईला परत आणण्याचे साकडे घातले. मात्र, त्याने टोलवाटोलवी केली. त्यानंतर तिने कांचनबाग पोलिस ठाण्यात धाव घेत हा प्रकार कथन केला असता, पोलिसांनी अक्रमला बोलावून घेतले. तेथे त्याने फेब्रुवारीमध्ये आईला परत आणण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप ती आलेली नाही. याबाबत पोलिसांकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे समिनाने तक्रारीत म्हटले आहे. 

ज्या व्यक्तीस सलमा यांची विक्री करण्यात आली आहे, त्याने सलमा यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो धुडकावून लावल्यानंतर त्याने आपल्या आईचा छळ करण्यास सुरवात केली. सलमा यांनी भारतात परतण्यास त्याचा विरोध आहे, अशी माहितीही समिनाने दिली आहे. दरम्यान, सौदीमध्ये छळाचा सामना करणाऱ्या सलमा यांनी एक ऑडिओ संदेश पाठविला असून, त्यात भारत सरकारने यातून आपली सुटका करावी, अशी विनंती केली आहे. 

कफाला पद्धती 
"जीसीसी'चे सदस्य देश असणाऱ्या कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि अरब अमिरातमध्ये कफाला पद्धत चालते. याअंतर्गत परदेशांतून कामासाठी येणाऱ्या व्यक्तींचे प्रायोजकत्व स्थानिक नागरिक (काफिल) किंवा एखाद्या कंपनीला स्वीकारावे लागते, त्यामुळे येणारी प्रत्येक व्यक्ती अशा प्रायोजकाच्या मर्जीवर अवलंबून असते. याचाच फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. बहुतांशी आखाती देशांत मालकाच्या परवानगीशिवाय कोणीही देश सोडून जाऊ शकत नाही. 

माझ्या आईला सोडविण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करतेय. तेलंगणा व केंद्र सरकारने याप्रकरणी लक्ष देऊन आपल्या आईची सुटका करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. 
- समिना बेगम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com