उरीमध्ये शोधमोहिम सुरु

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

णखी काही दहशतवादी या भागात असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे आज पहाटेपासूनच जवानांनी शोध मोहिम सुरू केली. गेल्या वर्षी उरीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणेच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता

श्रीनगर - उरी येथे हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आज उरी आणि परिसरामध्ये जोरदार शोधमोहिम सुरू केली आहे. या भागात अद्यापही काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यामुळे नियंत्रण रेषेजवळील भागांची कसून तपासणी केली जात आहे.

काल (ता. 24) उरी येथे जवानांनी एका कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. या मोहिमेत तीन नागरिक आणि एक जवान जखमी झाले होते. या तीन दहशतवाद्यांबरोबर आणखी काही दहशतवादी या भागात असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे आज पहाटेपासूनच जवानांनी शोध मोहिम सुरू केली. गेल्या वर्षी उरीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणेच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता.