'रोमिओविरोधी पथक म्हणजे केवळ संस्कृतीरक्षण'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या संरक्षणासाठी रोमिओविरोधी पथक स्थापन केले आहे. मात्र, समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते उदयवीर सिंह यांनी या पथकावर टीका केली असून भारतीय जनता पक्षाला महिलांची कोणतीही चिंता नसून ते सुरुवातीपासून केवळ संस्कृतीरक्षणाच करत असल्याचा आरोप केला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या संरक्षणासाठी रोमिओविरोधी पथक स्थापन केले आहे. मात्र, समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते उदयवीर सिंह यांनी या पथकावर टीका केली असून भारतीय जनता पक्षाला महिलांची कोणतीही चिंता नसून ते सुरुवातीपासून केवळ संस्कृतीरक्षणाच करत असल्याचा आरोप केला आहे.

सिंह यांनी मागील सरकारच्या 1090 या मदतकक्ष क्रमांकाची तुलना रोमिओविरोधी पथकाशी केली. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लोकांना मारहाण करून दुकाने बंद करण्यापेक्षा आमच्या सरकारने महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांची सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न केला, असे सिंह म्हणाले. वृत्तसंस्थेशी बोलताना ते पुढे म्हणाले, 'सरकार बदलल्यापासून आम्हाला असे वाटते की, अधिकारीवर्ग सत्ताधीशांप्रतीची निष्ठा दाखविण्यासाठी सामान्य जनतेला त्रास देत आहे. महिलांची सुरक्षितता हा मोठा विषय आहे. त्यासंदर्भातील सर्व अडचणींचे समाधान करायला हवे. 1090 हा मदतकक्ष क्रमांक त्यासाठीच सुरू केला. ते (भाजप) जे काही करत आहेत ते केवळ लोकप्रियतेसाठी करत आहेत.'

महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी आदित्यनाथ यांनी बुधवारी आदित्यनाथ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक जावेद अहमद यांना रोमिओविरोधी पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Anti-Romeo squad : BJP can only on moral policing