अँटी रोमिओ स्कॉडकडून तरुणाचे मुंडन

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

पब्लिक पार्कबाहेर मुंडन केलेला तरुण आपल्या मैत्रिणीसोबत बसला असताना त्याच्यावर अँटी रोमिओ स्कॉडकडून कारवाई करण्यात आली. तरुणीला त्याठिकाणाहून जाण्यास सांगून त्याचे मुंडन करण्यात आले. 

शहाजहाँपूर - उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूर येथील पब्लिक पार्कमध्ये अँटी रोमिओ स्कॉडच्या अधिकाऱ्यांनी महिलेचे शोषण केल्याच्या आरोपावरून एका तरुणाचे मुंडन केले.

गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून, शुक्रवारी याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिस कर्मचाऱ्यांसमोर तरुणाचे मुंडन करण्यात आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. 

शहाजहाँपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक के. बी. सिंह यांनी सांगितले, की सुहेल अहमद, लईक अहमद आणि सोनू पाल या तीन पोलिस कॉन्टेबलचे निलंबन करण्यात आले आहे. आरोपीचे मुंडन करण्यास रोखण्यास ते असमर्थ ठरल्याने त्यांचे निलंबन केले. 

पब्लिक पार्कबाहेर मुंडन केलेला तरुण आपल्या मैत्रिणीसोबत बसला असताना त्याच्यावर अँटी रोमिओ स्कॉडकडून कारवाई करण्यात आली. तरुणीला त्याठिकाणाहून जाण्यास सांगून त्याचे मुंडन करण्यात आले.