उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट उधळला; 2 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

उरी सेक्टरमध्ये एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात हे दोन दहशतवादी होते. जवानांनी हा कट उधळून लावत दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमध्ये एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात हे दोन दहशतवादी होते. जवानांनी हा कट उधळून लावत दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

लष्कराने शुक्रवारी माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला होता. या कारवाईत एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले होते. तसेच शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली होती. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांमध्ये लष्करी कारवायांमध्ये वाढ झाली असून, शनिवारी दोन पोलिसांवरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.