काश्‍मिरमध्ये आढळला लष्करातील अधिकाऱ्याचा मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

दक्षिण काश्‍मिरमध्ये लष्करातील एका अधिकाऱ्याचा शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे.

श्रीनगर - दक्षिण काश्‍मिरमध्ये लष्करातील एका अधिकाऱ्याचा शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे.

आज (बुधवार) शोपियन जिल्ह्यातील हेमेरेन परिसरात लेफ्टनंट दर्जाचे अधिकारी उमर फैयाज यांचा मृतदेह आढळून आला. फैयाज मूळचे कुलगाम येथील असून सहा महिन्यापूर्वीच फैयाज लष्करात रूजू झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते नातेवाईकांच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी शोपियन येथे गेले होते. एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी मंगळवारी त्यांचे अपहरण केले होते. कोणत्या कारणामुळे फैयाज यांचा मृत्यू झाला आहे, हे तपासण्यात येत असल्याची माहिती लष्करातील अधिकाऱ्याने दिली आहे.

Web Title: Army officer Umar Fayaz's body found in Kashmir's Shopian district