पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या पथकावर हल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

त्राल येथे भारतीय जवानांचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असून, पूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज (शनिवार) सकाळी दहशतवाद्यांनी लष्करी जवानांच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनीही प्रत्युत्तर दिले असून, अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

त्राल येथे भारतीय जवानांचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असून, पूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या गोळीबारात भारतीय जवान जखमी झालेला नाही.

आज सकाळी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी आहेत.