भारतीय लष्करातील जवान दहशतवाद्यांना सामील?

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

थोकर याच्याकडे एके-47 रायफल व शस्त्रसाठा असून तो थेट दहशतवाद्यांना सामील झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भातील नेमकी माहिती अद्यापी मिळालेली नाही

श्रीनगर - भारतीय लष्कराच्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील बारामुल्ला येथील छावणीमधून झहुर अहमद थोकर हा जवान बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

थोकर याच्याकडे एके-47 रायफल व शस्त्रसाठा असून तो थेट दहशतवाद्यांना सामील झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भातील नेमकी माहिती अद्यापी मिळालेली नाही. थोकर याला शोधण्यासाठी मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच काश्‍मीर खोऱ्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय लष्करामध्ये अशा स्वरुपाची घटना प्रथमच घडली आहे. काश्‍मीरमधील पोलिस दलातील कर्मचारी याआधी दहशतवाद्यांना सामील होण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.