कंडोममुळे 30 वर्षांनंतर पकडला बलात्कारातील आरोपी

Arrest made after 30 years over rape and murder of a child in Indiana after DNA match from condom
Arrest made after 30 years over rape and murder of a child in Indiana after DNA match from condom

नवी दिल्ली : एका 8 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या बालिकेची हत्या करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. मात्र, यातील आरोपीने वापरलेल्या कंडोममुळे त्याला पकडण्यात तब्बल 30 वर्षांनंतर पोलिसांना यश आले. 

1988 मध्ये आरोपी जॉन मिलर याने 8 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या बालिकेचा मृतदेह ती राहणाऱ्या आसपासच्या परिसरात मिळाला होता. त्यावेळी पोलिसांनी पीडित बालिकेचा डीएनए तपासासाठी ठेवला होता. या हत्येनंतर आरोपी मिलरला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र, आरोपी मिलर वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देत होता. 

पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार 1988 मध्ये दाखल केली होती. पीडित बालिकेचा डीएनए आणि आरोपी मिलरने वापलेल्या कंडोममुळे हे दोन्ही डीएनए मॅच झाले. त्यानंतर मिलरनेच तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मिलरला तब्बल 30 वर्षांनंतर अटक केली. 

दरम्यान, या संशयातून पोलिसांनी मिलरच्या घरी तपास सुरु केला होता. त्यादरम्यान पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता पीडित बालिकेची हत्या केल्याचे सांगितले. त्याने 1988 मध्ये बालिकेचे अपहरण आणि लैंगिक शोषण केले. त्यानंतर बालिकेचा गळा दाबून खून केल्याचेही त्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com