मोदीजी मोठ्या घरात आई, पत्नी बरोबर राहा- केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मोदींचे हृदय मोठे करून यांना आपल्या मोठ्या घरात ठेवले पाहिजे. मी माझ्या आईबरोबर राहतो. तसेच रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण, कधी याचा गाजावाजा करत नाही. मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेतही उभे करत नाही.

नवी दिल्ली - हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती असे सांगते की आपल्या वृद्ध आई आणि पत्नीला आपल्यासोबत ठेवले पाहिजे. पंतप्रधान निवास हे खूप मोठे असून, आता पंतप्रधान मोदींनी आपल्या आई व पत्नीला बरोबर ठेवले पाहिजे, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून, ते आज (मंगळवार) योगा न करता आईची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्यासोबत ते नाष्ता करणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत काही वेळही घालविणार आहेत. याच मुद्द्यावरून केजरीवाल यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. सतत मोदींवर टीका करणाऱ्या केजरीवाल यांनी आता भारतीय संस्कृतीचा दाखला देत मोदींना आई व पत्नीला आपल्यासोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 

केजरीवाल म्हणाले, की मोदींचे हृदय मोठे करून यांना आपल्या मोठ्या घरात ठेवले पाहिजे. मी माझ्या आईबरोबर राहतो. तसेच रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण, कधी याचा गाजावाजा करत नाही. मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेतही उभे करत नाही.

Web Title: Arvind Kejriwal criticize Narendra Modi