'ईव्हीएम'च्या आव्हानावर केजरीवालांचे प्रश्‍नचिन्ह

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार किंवा हॅकिंग करून दाखवा, असे आव्हान निवडणूक आयोगाने सर्वांना दिले आहे. मात्र, याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही अधिकृत महिती दिली नसल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या आव्हानावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार किंवा हॅकिंग करून दाखवा, असे आव्हान निवडणूक आयोगाने सर्वांना दिले आहे. मात्र, याबाबत आयोगाने कोणतीही अधिकृत महिती दिली नसल्याचे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या आव्हानावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे या आव्हानांवर शंका उपस्थित केली आहे. "निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत विधान केल्याचे कोणाला दिसले का? या संदर्भातील बातम्या सूत्रांमार्फत का देण्यात येत आहेत. निवडणूक आयोग अधिकृत पत्रक का प्रसिद्ध करत नाही? किंवा हा फसवण्याचा कट आहे का?', असे ट्विट करत केजरीवाल यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

'मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा दिवस या क्षेत्रातील कोणत्याही तज्ज्ञ, संशोधक, तंत्रज्ञाने निवडणूक आयोगाकडे यावे आणि ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार करून दाखवावा', असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे. हे आव्हान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा दिवस वेगवेगळ्या पातळ्यांवर देता येईल. आयोगाने 2009 मध्ये देखील अशाच प्रकारचे जाहीर आव्हान दिले होते; मात्र त्या वेळी मतदान यंत्रांत कोणीही हॅकिंग करू शकले नव्हते, असा दावा आयोगाने केल्याचेही वृत आहे.