केजरीवाल उपचारासाठी बंगळूरला जाणार

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढले आहे. सध्या त्यांनी तीनवेळा इन्सुलीन देण्यात येत आहे. ते 7 फेब्रुवारीला बंगळूरला निसर्गोपचारासाठी रवाना होणार आहेत. ते त्याठिकाणी 12 ते 14 दिवस असतील.

नवी दिल्ली - रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 7 फेब्रुवारीपासून बंगळूर येथे उपचारासाठी जाणार आहेत.

पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपवून केजरीवाल रविवारी दिल्लीला परतले आहेत. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर त्यांना उपचार करण्यासाठी बंगळूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचारात केजरीवाल यांनी प्रमुख भूमिका बजाविली आहे.

दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढले आहे. सध्या त्यांनी तीनवेळा इन्सुलीन देण्यात येत आहे. ते 7 फेब्रुवारीला बंगळूरला निसर्गोपचारासाठी रवाना होणार आहेत. ते त्याठिकाणी 12 ते 14 दिवस असतील. यापूर्वीही त्यांच्यावर तेथे उपचार झाले आहेत. केजरीवाल यांच्या घशावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.