'युपी'त खाते उघडण्यात एमआयएम अपयशी

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

लखनौ - खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्त्वाखाली एआयएमआयएम पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना एक जागेवर विजय मिळविता आलेला नाही.

एमआयएमने उत्तर प्रदेशमध्ये एकूण 38 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. एमआयएमला एकूण मतदानाच्या केवळ 0.2 टक्के मतदान मिळाले. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीतही एमआयएमच्या पदरी अपयशच पडले होते. बिहारमध्ये एमआयएमने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र तेथेही एकही विजय मिळविला आला नव्हता.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या पक्षालाही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच मुस्लिम बहुल भागांमध्ये जास्तीत जास्त मते भाजपलाच मिळाल्याचे आढळून आले असल्याचे सांगत "भाजपने एकाही मुस्लिम उमेदवार उमेदवारी दिली नाही; तरीही भाजपलाच इतकी मुस्लिम मते कशी मिळाली?' असे प्रश्‍न मायावती यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Asaduddin Owaisi's AIMIM fails to win a single seat in UP