फरारी दोन दहशतवाद्यांना एटीएसने बेड्या ठोकल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

लखनौ : लखनौ एन्काउंटरप्रकरणी फरारी 6 दहशतवाद्यांचा पाठलाग करताना उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दोन संशयित दहशतवाद्यांना पकडले. मास्टरमाइंड गौस मोहंमद खान आणि अझहर असे त्यांचे नाव आहे. मास्टरमाइंड गौस याने हवाई दलातही काम केल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी सैफुल्ला चकमकीच्या वेळी गौसदेखील तेथे घरात लपलेला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्यावर शस्त्रास्त्रे पुरवणे आणि युवकांना भडकवण्याचा ठपका आहे.

उत्तर प्रदेश एटीएसच्या मते, गौस मोहंमद खान हा या दहशतवादी मॉड्यूलचा मास्टरमाइंड आहे. त्याने आपले नाव करण खत्री असे ठेवले होते. तो कानपूरच्या जाजमोऊ येथील राहणारा आहे. दहशतवाद्यांना प्रेरणा देणे, साहित्य उपलब्ध करून देणे आणि युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्यास गौसचा हात आहे. अझहर हा शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देत होता. उर्वरित फरारी असलेले चार दहशतवादी बदला घेऊ शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. त्यापैकी दोघे दिल्लीला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संसदेसह अन्य संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून या दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना कानपूरमध्ये अटक केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सॅटेलाइट फोनने सापडले ठिकाण
चमकमकीपूर्वी दहशतवाद्यांकडून सॅटेलाइट फोन आणि बनावट एक्‍स्चेंजमार्फत माहिती पाठवत असताना नेटवर्क खराब झाल्याने ठिकाणाचा शोध लागला. या ठिकाणाची माहिती मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर एटीएसने लखनौ, कानपूर आणि इटावा येथून संशयितांना पकडले. मात्र, सैफुल्ला मारला गेला.

Web Title: ATS arrested two fugitive militants