३.५ एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होणार?

३.५ एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होणार?

नवी दिल्ली : तंत्रज्ञान दर दिवशी बदलत असते असे म्हणतात, मात्र या बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आपल्याशी अनेक वर्षांपासून सोबत असणाऱ्या आपल्याला सवयीच्या झालेल्या गोष्टी बदलू लागल्या की टेकसॅव्हींना त्याचा राग येतो. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ आपल्याला सुश्राव्य संगीत ऐकवणारा 3.5 एमएम ऑडिओ जॅक आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे, (उलटी गणती सुरूच झाली आहे म्हणा ना!) त्यामुळेच आता टेकसॅव्ही नेटकरांनी फेसबुक, ट्विटरवर "सेव्हजॅक‘ या हॅशटॅगच्या आधारे या 'जॅक‘ला वाचविण्यासाठी मोहीम राबविली आहे. 

कोणत्याही फोनला, टीव्हीला, संगणकाला, कारमधील आणि अन्य म्युझिक सिस्टिम्स, गेम कन्सोल्सना असलेला हा 3.5 एमएम जॅक काढून "लिइको‘ या मोबाईल कंपनीने वेगळे तंत्रज्ञान असलेला हेडफोन बाजारात आणला खरा. पण यामुळे गेल्या 50 वर्षाची परंपरा मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जगातील इतरही मोबाईल कंपन्या लवकरच ही पद्धत अवलंबतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच "ऍपल‘ या आघाडीच्या मोबाईल कंपनीनेही आयफोन 7 मधून 3.5 एमएम जॅक काढल्याच्या चर्चा आहेत. ‘ऍपल‘सारख्या ट्रेंड सेटर्सना छोट्या कंपन्या लगेचच फॉलो करत असल्याने हा "जॅक‘ कधीही कालबाह्य होऊ शकतो अशी भीती आहे. 

अर्थात या सर्वांवरच पर्याय म्हणून काही जण वायरलेस हेडफोनही वापरतील; पण अद्याप तरी ही टेक्‍नॉलॉजी तितक्‍या प्रभावीपणे मार्केटमध्ये येण्याची चिन्हे कमी आहेत. वायरलेस टेक्‍नॉलॉजी आली किंवा "जॅक‘ बदलला तरी तुमचे सध्याचे हेडफोन तुम्हाला लवकरच कचऱ्यातच फेकावे लागणार आहेत. 

यासाठी संघर्ष 
काही जणांना मात्र हे अजिबात मान्य नाही. केवळ मोबाईलवरून गाणी ऐकण्यासाठीच नव्हे तर मोबाईल कार म्युझिक सिस्टिमला कनेक्‍ट करण्यासाठी, एकट्याने टीव्ही पाहण्यासाठी एवढेच नव्हे हल्ली तर डीजे कन्सोल्सनाही 3.5 एमएम जॅक मोबाईल कनेक्‍टिव्हिटीसह उपलब्ध असतात. एवढ्या सगळ्या सुविधा संपविणारे नवे तंत्रज्ञान काहींना नकोसे वाटत आहे. त्यामुळेच आता फेसबुक आणि ट्‌विटरवर #SaveJack अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यानंतर याबाबत याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com