औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रेल्वे रुळावरून घसरली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

रेल्वे प्रशासनाने मदत क्रमांकही खुले केले आहेत. ते खालीलप्रमाणे -
हैदराबाद - 040-23200865
परळी - 02446-223540
विक्राबाद - 08416-252013
बिदर - 08482-226329

भालकी (कर्नाटक) - औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर आज (शुक्रवार) कर्नाटकमधील खालगपूर आणि भालकी स्थनकाच्या दरम्यान रूळावरून घसरली आहे. मात्र या घटनेत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही.

कर्नाटक आणि हैदराबाद सीमेवर आज सकाळी हा अपघात झाला. आपत्ती व्यवस्थापन पथक, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेत आहेत. या अपघाताची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात चरेल्वे रूळावरून घसरण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे राज्य राणी एक्‍सप्रेसचे आठ डबे रूळावरून घसरले होते. तर मागील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये महाकौशल एक्‍सप्रेस रूळावरून घसरून 50 जण जखमी झाले होते.

रेल्वे प्रशासनाने मदत क्रमांकही खुले केले आहेत. ते खालीलप्रमाणे -
हैदराबाद - 040-23200865
परळी - 02446-223540
विक्राबाद - 08416-252013
बिदर - 08482-226329