बॅंकेतील 44 बनावट खात्यात आढळले 100 कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- येथील चांदनी चौकामध्ये असलेल्या एक्सिस बॅंकेवर आयकर विभागाने आजा (शुक्रवार) छापा घातला. छाप्यादरम्यान 44 बनावट खात्यांमध्ये तब्बल 100 कोटी रुपये आढळले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. यानंतर या खात्यांमध्ये 100 कोटी रुपये जमा झाले आहेत. केवायसीची सक्ती असतानाही हा नियम पाळण्यात आलेला नाही. बनावट कागदपत्रे वापरुन ही बनावट खाती तयार करण्यात आली होती. सोने खरेदीसाठी या रक्कमेचा वापर केला जाण्याची शक्यता तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे. बँकेचे अधिकाऱयांची याबाबत विचारणा सुरू आहे.

दरम्यान, नोटाबंदीनंतर एक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेवर मारण्यात आलेला हा दुसरा छापा आहे. एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असून, तिन किलो सोने ताब्यात घेण्यात आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.