आय लव्ह पाकिस्तान लिहिलेले फुगे जप्त

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

गोविंदनगर येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी "आय लव्ह पाकिस्तान' आणि "हबिबि' असा मजकूर लिहिलेले फुगे जप्त केले. त्याचा अर्थ "माय लव्ह' किंवा "माय डार्लिंग' असा आहे, असे पोलिसांनी सांगितले. गोविंदनगर येथील प्रावधान स्टोरमधून हे फुगे जप्त करण्यात आले

कानपूर -  "आय लव्ह पाकिस्तान' अशा आशयाचा मजकूर लिहिलेले फुगे आज पोलिसांनी एका दुकानातून जप्त करून, या प्रकरणी दोन जणांना अटक केली, असे पोलिसांनी आज सांगितले.

गोविंदनगर येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी "आय लव्ह पाकिस्तान' आणि "हबिबि' असा मजकूर लिहिलेले फुगे जप्त केले. त्याचा अर्थ "माय लव्ह' किंवा "माय डार्लिंग' असा आहे, असे पोलिसांनी सांगितले. गोविंदनगर येथील प्रावधान स्टोरमधून हे फुगे जप्त करण्यात आले, असे पोलिस ठाण्याचे अधिकारी अमित सिंह यांनी सांगितले. भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत एकात्मिततेला बाधा उत्पन्न केल्याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.