उत्तर कर्नाटकात पावसामुळे जनजीवन विस्कळित

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

बंगळूर : उत्तर कर्नाटकात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कलबुर्गी, दावणगिरी आणि विजयपुरा जिल्ह्यांत जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचे पाणी अनेक घरे, रुग्णालये आणि अन्य भागांत घुसले आहे.

बंगळूर : उत्तर कर्नाटकात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कलबुर्गी, दावणगिरी आणि विजयपुरा जिल्ह्यांत जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचे पाणी अनेक घरे, रुग्णालये आणि अन्य भागांत घुसले आहे.

कलबुर्गी येथील केबीएन रुग्णालयातील अनेक रुग्णांना विशेषत: बालकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सामान्यांनाही चालण्यास अनेक समस्या येत आहेत. कलबुर्गीच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दावणगिरीमध्ये पावसामुळे दहापेक्षा अधिक घरे पडली आहेत किंवा त्यांना तडे गेले आहेत. विजपुरा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. या पावसामुळे अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.